श्रद्धा वालकरच्या हत्याकांडाने देश हादरून गेला आहे. मात्र दुसरीकडे समाजात काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. मध्य प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. मुस्लिम तरुणीने हिंदू धर्म स्वीकारत हिंदू तरुणाशी लग्न केले आहे.
सध्याच्या वातावरणात ही चांगली बातमी म्हणावी लागेल. मध्यप्रदेशातील गुना येथील नाझनीन आणि दीपक गोस्वामी हे विवाह बंधनात अडकले. वास्तविक त्या दोघांची ओळख tiktok झाली होती. मध्यंतरी भारतात टिकटॉक बॅन करण्यात आले.
मात्र त्या दोघांचे प्रेम संबंध अधिक दृढ झाले. यातूनच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्रेमासाठी नाझनीनने आपला धर्म बदलला. ती आता हिंदू बनली आहे. तिने आपले नाव नयना असे ठेवले आहे. एका मंदिरात त्यांनी विवाह केला असून लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.