खेळ

पावसाने न्यूझीलंडचा गेम केला ; भारताने मालिका जिंकली

टी 20 वर्ल्ड कपनंतर सध्या भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला टी ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला तर दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली.  आज खेळल्या गेलेल्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात भारत हरता हरता जिंकला. वास्तविक या सामन्यादरम्यान पावसाने अडथळा आणला आणि हा सामनाच रद्द करण्यात आला.

भारताने ही मालिका जिंकल्याचे जाहीर करण्यात आले. तिसऱ्या सामन्यात न्युझीलँडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्युझीलँडने वीस ओव्हर मध्ये 160 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या शतकापर्यंत भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते.
दरम्यान भारताने चार गडी झटपट गमावल्यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी सुरू केली. दरम्यान आठव्या ओव्हरमध्ये पावसाला सुरुवात झाली. यावेळी भारताची अवस्था चार बाद 75 अशी होती. मात्र पाऊस न थांबल्यामुळे हा सामना टाय म्हणून जाहीर करण्यात आला. अखेर भारताने ही मालिका एक – शून्य या फरकाने जिंकली.

Related Articles

Back to top button