क्राईम
श्रद्धा प्रकरणी मोठी अपडेट, आफताबची कोर्टात कबुली, म्हणाला – जे झालं ते रागाच्या भरात

श्रद्धा हत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताब याने आतापर्यंत सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, या माहितीत किती तथ्य आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मी जे काही केले ते रागाच्या भरात केले, अशी कबुली आफताबने आज न्यायालयात दिली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली.
यावेळी त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पॉलिग्राफी चाचणीला अफताबने परवानगी दिली आहे. त्यानुसार, आता न्यायालयानेही त्याच्या पॉलिग्राफी चाचणीला परवानगी दिली आहे.
यात एकूण १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात येते. आतापर्यंत ५-५ दिवसांची दोनवेळा कोठडी देण्यात आली आहे. त्यानुसार, आता चार दिवसांची कोठडी वाढवण्यात आली आहे.
या दरम्यान पॉलिग्राफी चाचणी होईल आणि त्यानंतर नार्को चाचणीही करण्यात येणार आहे. आफताबकडून गुन्ह्याची कबुली घ्यायची आणि त्याच्याविरोधात सर्व पुरावे गोळा करायचे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आता असणार आहे. यासाठी पोलिसांकडे फक्त चार दिवस राहिले आहेत.