मनोरंजन

कृपया ‘पुष्पा २’ पाहण्यासाठी पैसे घालवू नका

  • सध्या सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा २ : द रूल’ हा सिनेमा खूप चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई केली आहे. आता चित्रपटाने जवळपास चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका बिग बॉस मराठीच्या स्पर्धकाने कृपया ‘पुष्पा २’ पाहण्यासाठी पैसे घालवू नका, असे स्पष्ट मत मांडले आहे.
  • बिग बॉस मराठी सिझन पाचमधील स्पर्धक, इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ही देखील हा सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. सिनेमा पाहून आल्यावर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट मत मांडले आहे. ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाही. त्यांच्यासाठी अंकिताची पोस्ट ही विचार करायला भाग पाडणारी आहे.
  • अंकिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ‘पुष्पा २ : द रूल’ सिनेमाचा थोड्यात रिव्ह्यू दिला आहे. तिने अभिनय १००/१००. स्टोरी काहीच नाही. पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग यापेक्षा खूप चांगला होता. कृपया तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. मला वाटते करमणूक हे एक सशक्त माध्यम आहे आणि जे चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात ते काळजीपूर्वक चालले पाहिजेत, असे म्हटले आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या सिनेमाविषयीचे अंकिताचे हे वक्तव्य लक्षवेधी ठरत आहे.

Related Articles

Back to top button