ब्रेकिंग! केंद्रीय निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय

Admin
1 Min Read
  • देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तसेच या निवडणुकांत केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका हा विषय केंद्रस्थानी आहे. निवडणुकांत मतचोरी झाल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. बिहारमध्ये काँग्रेस आयोजित केलेल्या व्होट अधिकार यात्रेत याच मुद्द्याला केंद्रस्थांनी ठेवून भाजप, निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. असे असतानाच आता एकीकडे विरोधकांकडून अनेक आरोप होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) नवी गाईडलाईन जारी केली आहे.
  • या नव्या नियमांची अंमलबजावणी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. या नव्या गाईडलाईन्सनुसार आता ईव्हीएमवर उमेदवारांचे पहिल्यांदाच रंगीत फोटो लावले जाणार आहेत. सोबतच ईव्हीएमवरील अनुक्रमांकही आता आणखी स्पष्ट दिसतील अशी त्यांची रचना केली जाणार आहे.
  • निवडणूक आयोगाच्या या नव्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी लवकरच होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक स्पष्ट व्हावी तसेच मतदारांना मतदान करताना सर्व उमेदवारांचे फोटो स्पष्टपणे दिसावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Share This Article