- मुख्यमंत्र्याच्या दक्षता पथकाने एका नागरी सेवा अधिकाऱ्याच्या घरात छापा टाकल्यानंतर पथकातील कर्मचारी, अधिकारीही थक्क झाले एवढी माया, नागरी सेवा अधिकाऱ्याच्या घरात सापडली.
- मोजता, मोजता पथकही थकून गेले, तब्बल दोन कोटींवर धन या अधिकाऱ्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहे. आसाममध्ये आसाम नागरी सेवा अधिकारी नुपूर बोरा यांच्या घरावर हा मुख्यमंत्री दक्षता पथकाने हा छापा घातला; या छाप्यामुळे आसाममध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे यातून दिसून येत आहे. नुपूर बोरा यांच्या गुवाहाटी येथील घरावर मुख्यमंत्री दक्षता पथकाने छापा टाकला. या छाप्यात तब्बल ९० लाख रुपयांची रोकड आणि एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य सुमारे दोन कोटी रुपये झाले आहे.
- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, नूपुर बोरा गेल्या सहा महिन्यांपासून दक्षता पथकाच्या पाळतीवर होत्या. बारपेटा जिल्ह्यात सर्कल ऑफिसर म्हणून काम करत असताना त्यांनी कथितरित्या ‘मिया’ (अवैध स्थलांतरित) म्हणून संशयित असलेल्या लोकांसाठी बेकायदेशीर जमीन नोंदणी करून दिली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.
- प्राप्त माहितीनुसार, सुरुवातीला रविवारी रात्री छापा टाकण्याचे नियोजन होते, पण नूपुर बोरा घरी नसल्याने तो पुढे ढकलण्यात आला. त्या एका गेस्ट हाऊसमध्ये थांबल्या होत्या. सोमवारी सकाळी त्या गुवाहाटी येथील घरी परतल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित आणखी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले.
बापरे! दोन कोटींवर कॅश अन् सोन्याचे घबाड जप्त
