- चौत्रा पुणे नका तरुण मंडळाचे कार्यकर्ते सतीश शिंदे हे पुणे नाका येथील दगडी पूलावरून रिक्षासह वाहून गेल्याप्रकरणी शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे मंगळवारी प्रचंड आक्रमक झाले. पुणे नाका परिसरातील सुमारे ३०० नागरिकांना घेऊन पुरुषोत्तम बरडे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर तसेच पूल तोडणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
- चार दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड पावसामुळे जुना पुणे नाक्यावरून गणेश नगर मडकी वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरून जाताना सतीश शिंदे हा रिक्षा चालक रिक्षासह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. सोलापूर महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र व सोलापूर शहर वाहतूक शाखेची पूर्व परवानगी नसताना कंत्राटदाराने येथील पूल पडला आहे. तसेच या रस्त्यावर कोणतेही बॅरेगेटिंग न केल्यामुळे अंधारात रिक्षा चालकाला तुटलेला पूल न दिसल्याने रिक्षा पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये पडून रिक्षासह सतीश शिंदे वाहून गेले. या संपूर्ण घटनेला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३०२ प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुरुषोत्तम बरडे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
- यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका आकुलवार यादेखील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्या येताच पुरुषोत्तम बरडे यांनी मनपा अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी श्री बरडे म्हणाले, या पुलावरून दररोज हजारो नागरिक आणि शाळकरी मुले सोलापूर शहरात येतात हा पूल कंत्राटदारांनी महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता तोडल्यामुळे सतीश शिंदे हे वाहून गेले आहेत. तसेच या परिसरातील सुमारे १ हजार शाळकरी मुलांचा रहदारीचा रस्ता बंद झाला आहे. ही मुले मुख्य महामार्गावरून उलट्या दिशेने सोलापुरात आली तर येथे मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन लहान मुलांचा जीव जाण्याची शक्यता आहे. सतीश शिंदे वाहून गेल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचा गलथान कारभार उघड झाला आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेने शिंदे कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेच्या सेवेत घ्यावे. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ही पुरुषोत्तम बरडे यांनी याप्रसंगी केली.
- यावेळी पुरुषोत्तम बरडे, सुरेश जगताप, अमर चौगुले, आशुतोष बरडे, राजू आलुरे, अमोल झाडगे, किरण पवार, विनय ढेपे, आनंद भवर, राजकुमार माने, गायत्री सतीश शिंदे, भारती शिंदे, सलीमा सय्यद, वंदना माने, सुनिता माने, दैवशीला मोरे, सलीमा सय्यद, सुनील शिंदे, महेश क्षीरसागर, सचिन सुरवसे, योगेश क्षीरसागर, विष्णु जवंजाळ, सलीम शेख, रोहित सुरवसे, अमर पाटील, अंबादास तलवार, राजू पांढरे , तुषार आवताडे, अजय अमनूर, शिवाजी शेवतेकर, संदीप भोसले, संभाजी कोडगे, राहुल कालेकर, गणेश निराळे, संतोष पवार, सतीश पवार, शिवा पवार, कुंदन पवार, राहुल बचुटे, लक्ष्मण शिंदे, मारुती खानापुरे, विजय शिंदे, गणेश खानापुरे, गणेश नागणे, ओंकार सुतार आदींसह चौत्रा पूना नाका तरुण मंडळाचे पदाधिकारी व जुना पूना नाका, वारद फार्म, गणेश नगर, हांडे प्लॉट, माशाळ वस्ती परिसरातील असंख्य महिलांसह नागरिक आदी उपस्थित होते.
- ————
- शिंदे कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास महामार्ग रोखू
- सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे सतीश शिंदे वाहून गेले आहेत. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांना त्वरित न्याय न मिळाल्यास सोलापूर – पुणे महामार्ग रोखू असा इशारा पुरुषोत्तम बरडे यांनी याप्रसंगी दिला.
- ———-
- महापालिकेला मृतदेहाचीही पर्वा नाही
- सोलापूर महानगरपालिकेने सतीश शिंदे यांना शोधण्यासाठी एनडीआरएफची तुकडी बोलावली. परंतु या तुकडीकडे असलेल्या बोटीत भरण्यासाठी इंधना करताही पैसे नसल्याचे दिसून आले. परिसरातील नागरिकांनी पैसे गोळा करून बोटीत इंधन भरले. या उपरही सतीश शिंदे हे अद्यापही मिळालेले नाहीत. यावरून सोलापूर महानगरपालिकेला नागरिकांच्या जीवाचीच नव्हे तर मृतदेहाचीही पर्वा नसल्याचे दिसून येत आहे, असेही पुरुषोत्तम बरडे याप्रसंगी म्हणाले.
सोलापूर! रिक्षाचालक सतीश शिंदे वाहून गेल्या प्रकरणी बरडे आक्रमक
