आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Admin
1 Min Read
  • पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात फरार झालेल्या आंदेकर टोळीतील चौघा जणांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आठ झाली आहे. या प्रकरणी याआधी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बंडू आंदेकर (64), तुषार वाडेकर (24), स्वराज वाडेकर (21), वृंदावनी वाडेकर (40), अमन युसूफ पठाण उर्फ खान (22), सुजल मेरगू (23), तसेच अमित पाटोळे (19) आणि यश पाटील (19) यांचा समावेश आहे.
  • गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा खून आंदेकर टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. वनराज आंदेकरांचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगकडून काही केले जाऊ शकते, याची शक्यता होती. म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र आंदेकरच्या टोळीने गणेश कोमकरचा मुलगा टार्गेट केल्याने गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात खळबळ उडाली होती.
Share This Article