- पुण्यातील टोळीयुद्धाने पुन्हा एकदा तणाव निर्माण केला आहे. शुक्रवारी 18 वर्षीय आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. हा हल्ला वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यासंबंधी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री सुमारे आठ वाजता पुण्यातील नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुषवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
- सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांची नावे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आयुष आपल्या क्लासवरुन घरी परतत असताना गाडी पार्क करत असताना या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. एकूण 9 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी या मारेकरी ओरडत होते की ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच‘ आहेत.
- आयुषची हत्या शुक्रवारी झाली होती, तर दुसऱ्या दिवशी दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचे विसर्जन पार पडले. पोलिसांनी तणाव टाळण्यासाठी मृतदेह ससून रुग्णालयातील शवागारात ठेवला होता. आज त्याच्या वडिलांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडून आयुषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
मारेकरी म्हणाले, इथे फक्त आंदेकरच…!
