मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार

Admin
1 Min Read
  • काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. 
  • तर आता पुन्हा एकदा या प्रकरणात राहुल यांनी मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राहुल सध्या बिहार दौऱ्यावर असून मतदार अधिकार यात्रा करत आहे. या यात्रेदरम्यान एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे. ॲटम बॉम्बनंतर आता मोठा हायड्रोजन बॉम्ब येत आहे. तुमच्या मत चोरीचे सत्य आता संपूर्ण देशाला कळणार आहे, असे राहुल या सभेत बोलताना म्हणाले. तसेच या हायड्रोजन बॉम्बनंतर मोदी देशातील जनतेला आपला चेहरा दाखवू शकणार नाहीत, असा दावा देखील राहुल यांनी केला आहे.
  • या सभेत बोलताना राहुल म्हणाले की, महादेवपुरा येथे ‘मत चोरी’च्या स्वरूपात ॲटम बॉम्ब टाकल्यानंतर आम्ही लवकरच हायड्रोजन बॉम्ब आणू. महात्मा गांधींची हत्या करणारे आता लोकशाही आणि संविधान मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना हे करू देणार नाही. अलिकडेच आम्ही देशासमोर ‘मत चोरी’ चे पुरावे सादर केले. मत चोरी म्हणजे लोकांच्या हक्कांची, लोकशाहीची आणि भविष्याची चोरी, असे राहुल म्हणाले.
Share This Article