अमेरिकेच्यावतीने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला गेला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे अमेरिकेसोबतचा व्यापार भारताने करणे बंद केले.
तर भारत आता आत्मनिर्भर बनण्यासाठी विविध प्रकारे विविध देशांसोबत करार करू लागला आहे, अशातच भारताने अमेरिका अर्थात डोनाल्ड ट्रम्प सरकारला पुन्हा मोठा दणका दिला आहे.
भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. भारताच्या Advanced Medium Combat Aircraft या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानासाठी आवश्यक असलेल्या शक्तिशाली जेट इंजिनच्या निर्मितीसाठी भारताने अमेरिकेऐवजी फ्रान्ससोबत करार केला आहे.
या करारानुसार भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि फ्रेंच कंपनी Safran संयुक्तपणे १२० kN क्षमतेचे जेट इंजिन भारतात विकसित करणार आहेत. या निर्णयामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले असून, अमेरिकेसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
या कराराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रान्सकडून भारताला शंभर टक्के तंत्रज्ञान हस्तांतरण मिळणार आहे. याचा अर्थ, या इंजिनचे डिझाइन, विकास, चाचणी, प्रमाणिकरण आणि उत्पादन या सर्व प्रक्रिया पूर्णपणे भारतातच पार पडतील. यामुळे भारताचे एअरोस्पेस क्षेत्र पूर्णपणे स्वयंपूर्ण होईल आणि भविष्यात भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.