- निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष सारखेच आहेत. कोणताही पक्ष जवळचा किंवा दूरचा नाही. त्यामुळे अनेकदा वेगवेगळे आरोप होतात. त्यामध्ये सत्यता नाही. आम्ही पक्षपाती नाही तर निष्पक्ष काम करतो, असे म्हणत निवडणूक आयोगाने आज काँग्रेस नेते राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत हे मत मांडले.
- ज्या पद्धतीने आरोप केले गेले ते पाहता लक्षात येते की हे आरोप करत असले तरी, जी काही सत्यता आहे ही त्यांच्यापर्यंत पोहचत नाही किंवा त्यांना ग्राऊंड पातळीवर काय सत्यता आहे हे माहिती नाही. हा सगळा भ्रम पसरवण्याचा हा प्रयोग आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी पाहिलं की, अनेक मतदारांचे फोटो त्यांच्या अनुमती न घेता मीडिया समोर ठेवले गेले. त्यांच्यावर आरोप केले गेले. त्यांच्या फोटोचा वापर केला गेला. आपल्या आई, बहीण, मातांचे सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाने दिली पाहिजेत का? वोट चोरी असा शब्द वापरून लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचे हे काम आहे. तसेच, हा संविधानाचाही अपमान आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
- कोणत्याही तक्रारीसाठी आयोगाचे दरवाजे नेहमीच खुले असतात. मत चोरीसारख्या शब्दांचा वापर पूर्णपणे चुकीचा आहे, अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका दाखल करायला हवी होती. मतदारांचे फोटो, नावे आणि ओळखपत्रे सार्वजनिकरित्या दाखवण्यात आली होती, जी पूर्णपणे चुकीची आहे.
- त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे दरवाजे नेहमीच सर्वांसाठी समानतेने खुले असतात. जमिनीवर, सर्व मतदार, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व बूथ लेव्हल अधिकारी पारदर्शक पद्धतीने एकत्र काम, पडताळणी, स्वाक्षरी करत आहेत आणि व्हिडिओ प्रशंसापत्रे देखील देत आहेत.
- ही पडताळणी केलेली कागदपत्रे, राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे आणि त्यांनी नियुक्त केलेल्या बीएलओंचे प्रमाणपत्रे त्यांच्या स्वतःच्या राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा जमिनीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष करून गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही गंभीर चिंतेची बाब आहे, असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.
ब्रेकिंग! आपली आई, बहीण, मातांचे सीसीटीव्ही फुटेज…, मुख्य निवडणूक आयुक्त संतापले
