देश - विदेश
तिची भविष्यवाणी खरी ठरली!

- अहमदाबादमध्ये काल मोठी विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाच्या या विमानात 242 प्रवासी होते, ज्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने शोक व्यक्त केला जात आहे. अशातच आता एका महिला ज्योतिषाचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने मोठ्या विमान अपघाताचे भाकित वर्तवले होते.
- अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर ज्योतिषी शर्मिष्ठा यांनी केलेले एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2025 मध्ये विमान वाहतूक क्षेत्र चांगले काम करेल. विमान अपघाताच्या बातम्या आपल्याला धक्का देऊ शकतात, असे भाकित केले होते. विमान वाहतूक क्षेत्रात आधीच थोडी सुधारणा सुरू झाली आहे. जेव्हा गुरु ग्रह मिथुन राशीत असेल तेव्हा मृगशिरा आणि अर्द्राच्या भागात अंदाजे वेगाने असेल, असे ट्विट त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये केले होते.
- या दुर्घटनेनंतर आता नेटकऱ्यांनी हे ट्विट शोधून काढत त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही अचूक भविष्यवाणी असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.



