क्राईम

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

  • राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी हा पोलिसांसमोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पैसा, ड्रग्स, अनैतिक संबंध यातून गुन्हेगारी घडत असताना आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीने मित्राच्या मदतीने एकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मयत तरुण वारंवार तरुणीला त्रास द्यायचा, त्यातून ही घटना घडल्याचे आत्तापर्यंतच्या प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. 
  • जिम ट्रेनर असलेल्या प्रांजलसोबत आज दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा एकदा गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे याच्याकडून त्रास देण्याचा तोच प्रकार घडला. त्यावेळी प्रांजलने गोपीनाथच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिने आणि यशने मिळून लोखंडी रॉड आणि पहारने मारहाण केली. यात गोपीनाथ गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेतील गोपीनाथला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले. मग प्रांजल आणि यश दिघी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले अन् घडला प्रकार पोलिसांना सांगितला. 
  • प्रांजल आणि यश ज्या जिमचे ट्रेनर आहेत, त्याच जिममध्ये गोपीनाथ जिमला येत होता. तिथंच यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली. मात्र, गोपीनाथ प्रांजलकडे पैशांची मागणी का करत होता? तो तिला शिवीगाळ करुन का त्रास देत होता? असा आरोप केला जता आहे. मात्र, हे अद्यापही अस्पष्ट आहे. आता, पोलीस तपासात प्रांजल आणि यशकडून या बाबी समोर येतील. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button