क्राईम

ब्रेकिंग! राज्यात दुहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ

  • राज्यात दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा – पाटोदा चौकात जमिनीच्या वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. भर चौकात पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • मृतांची नावे सहदेव पवार आणि प्रियंका पवार अशी आहेत.
  • मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या जमिनीच्या वादातून पुन्हा कुरापत काढत आरोपींनी प्रथम पती-पत्नीला गाडीने जोरदार धडक दिली. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून दोघांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात आरोपी जीवन चव्हाण आणि हरीबा चव्हाण या बाप-लेकासह इतर काही जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
  • मृत सहदेव हा केवळ 15 दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. याआधी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणातीलच जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सहदेव आणि आरोपी यांच्यातील वाद जुना असल्याचे समोर आले आहे. 
  • या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Back to top button