विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला. तर निवडणूक आयोगाविरोधात आज संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यलयापर्यंत इंडिया आघाडीकडून मोर्चा काढण्यात येत आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली आज इंडिया आघाडीचे तब्बल 300 खासदार एकत्र येत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या या मोर्चाला परवानगी नाकराली आहे.
दिल्ली पोलिसांनी निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहेत. तर पोलिसांनी मोठी कारवाई करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरु आहे, असे यावेळी राहुल गांधी म्हणाले. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी दिली नसल्याने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.