पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू जवळ एका विद्यार्थिनीने घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणाली मधुकर नवले (वय १९) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
राहू गावा जवळ असलेल्या सोनवणे मळा (ता. दौंड) येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रणालीने बेडरूममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यासंदर्भात प्रणालीचा भाऊ प्रणव मधुकर नवले याने यवत पोलिसांना खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव याने त्याच्या मित्राला व आई-वडिलांना फोन करून घरी तात्काळ बोलावून घेतले. दरम्यान प्रणालीचे आई-वडील कामासाठी शेतात गेले होते. ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा उघडून प्रणालीच्या गळ्यातील दोरी कापून तिला खाली घेतले. प्रणाली हिला तातडीने पुढील उपचारासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रणालीच्या आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.