सोलापूर

रोहित पवारच मास्टरमाईंड

  • सोलापुरात शरणू हांडे यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण झाले. रात्री अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांनी शरणू यांना घरासमोरून शस्त्राचा धाक दाखवून गाडीत बसवले. यानंतर त्यांना मारहाण करून कर्नाटकच्या दिशेने नेले. पोलिसांनी वेळीच कारवाई करून शरणू यांना सुखरूप सोडवले आणि सात आरोपींना अटक केली. शरणू यांनी सांगितले की, आरोपींनी कोयते, हॉकी स्टिक आणि तलवारीने मारहाण केली. मला कुठे नेले जात आहे, हे देखील समजले नाही.
  • या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. 2021 मध्ये पडळकर यांची सोलापूर शहरात पत्रकार परिषद झाली होती. पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमित सुरवसे याने 2021 साली पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. याचा बदला म्हणून मे 2025 या महिन्यात शरणू याने अमित याला मारहाण करत व्हिडीओ तयार केला होता. मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर शरणू आणि अमित यांनी वाद मिटवून घेतला होता. याच जुन्या वैमनस्यातून अमितने पुन्हा बदला घेतला. अमित हा रोहित पवार यांचा जवळचा समर्थक आहे आणि या प्रकरणात रोहित पवार हेच मास्टरमाईंड आहेत, असा दावा पडळकरांनी केला आहे.

Related Articles

Back to top button