क्राईम

अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या

  • राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या चुलत भावाची हत्या करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पार्किंगवरुन झालेल्या किरकोळ वादातून काही जणांनी हुमाच्या भावावर(आसिफ) जीवघेणा हल्ला केला. यात आसिफचा मृत्यू झाला.
  • दिल्लीतील जंगपुरा भोंगल बाजार लेन भागात ही थरारक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री उशीरा स्कूटी गाडी गेटवरून साइडला हटवून लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात आरोपींनी आसिफवर हल्ला केला. यात आसिफ गंभीर जखमी झाले. याच अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
  • आसिफ यांची पत्नी आणि नातेवाईकांचे म्हणणे आहे की, किरकोळ वादातून आरोपींनी थेट जीव घेतला. आसिफच्या पत्नीने सांगितले की, पार्किंगच्या कारणावरुन माझ्या पतीचे आरोपींशी भांडण झाले. कामावरून घरी आल्यानंतर घरासमोर शेजाऱ्यांची स्कूटी पार्क करण्यात आली होती. स्कूटी येथून काढून घ्या, असे त्यांना सांगितले.
  • मात्र शेजाऱ्यांनी गाडी काढून घेण्याऐवजी आसिफ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला आणि धारदार वस्तूने आसिफ यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. हत्यारही जप्त करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Related Articles

Back to top button