राजकीय

ब्रेकिंग! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मोदींची भेट

  • देशाच्या राजकारणात खळबळजनक हालचालींना वेग आला आहे. महायुतीचे अनेक नेते सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत, तर इंडिया आघाडीचीही महत्वाची बैठक चालू आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अचानक भेट घेतली. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
  • राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी मोदींना भेट दिली. सुळे यांनी याबाबत सोशल मीडियावर लिहिताना, देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी महाराष्ट्राच्या कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी त्यांना भेट दिली. भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, असे नमूद केले आहे. परंतु ही भेट फक्त हस्तकलेच्या सन्मानापुरती मर्यादित आहे का? की त्यामागे राजकारणाचे धागे विणले जात आहेत? असे सवाल उपस्थित होत आहेत.
  • महत्त्वाचे म्हणजे सुळे दिल्लीमध्ये असतानाच उद्धव ठाकरेदेखील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे महायुतीतील प्रमुख चेहरे दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बैठकींना सामोरे जात आहेत. अशा तणावपूर्ण राजकीय वातावरणात सुळे यांची मोदींशी झालेली ही ‘भेट’ राजकीय वर्तुळात वेगळेच प्रश्न निर्माण करत आहे.

Related Articles

Back to top button