महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आज राहुल यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर नवीन बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

एक्झिट पोल काहीतरी वेगळेच सांगतात. पण निकाल वेगळाच लागतो. महाराष्ट्रात 40 लाख मतदार संशयित आहे. एक काळ असा होता, जेव्हा देशात मतदानासाठी इलेक्टॉनिक मशीन्स नव्हत्या. मात्र तरीही संपूर्ण देशात एकाच दिवशी मतदान करत असे. पण आज उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे मतदान होते. बिहारमध्ये इतर वेळी मतदान होते. मतदान महिने चालते. आम्हाला याची चिंता आहे. महाराष्ट्रात पाच महिन्यांत इतके मतदार जोडले गेले आहेत जे पाच वर्षात जोडले गेले नाहीत. महाराष्ट्रात संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार जोडले गेले आहेत. ज्यामुळे अधिक संशय निर्माण होते.

निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाही. सीसीटिव्ही फुटेज देत नाही. महाराष्ट्रात संध्याकाळी 5.30 नंतर बरेच मतदान झाले. पण याचा निवडणूक आयोग पुरावे देत नाही, असे राहुल म्हणाले.

यावेळी राहुल यांनी बनावट पत्त्यांचे पुरावे दाखवले. ज्यामध्ये मतदारांसमोरील घराचा पत्ता 0 असा लिहिलेला होता. तर असे अनेक लोक आहे ज्यांचे वडिलांचे नाव hhgassjk होते. तर घर नंबर 35 मधील 80 मतदारांनी एकाच पत्त्यावरून मतदान केले आणि घर नंबर 791 मधून एकाच पत्त्यावर 46 मतदारांनी मतदान केलेल्याचा आरोप देखील राहुल यांनी केला.

Related Articles

Back to top button