राजकीय

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे ऐकले नाही, जनतेचे काय ऐकणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली आहे. शिंदे यांनी बंड करून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी, खासदारांनी ठाकरे यांची साथ सोडली. दरम्यान राज्यातील बड्या नेत्यांमध्ये आरोप, प्रत्यारोपाचा खेळ सुरू आहे. त्यातच आता भाजपचे नेते राम कदम यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे. 

उद्धव यांनी त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे ऐकले नाही तर जनतेचे काय ऐकणार, असा सवाल कदम यांनी आहे. उद्धव यांनी बाळासाहेबांचे ऐकले असते तर, हा प्रसंग उद्भवला नसता. बाळासाहेब एकदा म्हणाले होते, माझा पक्ष काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही, तशी वेळ आली तर पक्ष बंद करून टाकेन. 
उद्धव यांनी सत्तेच्या स्वार्थापोटी बाळासाहेबांचे न ऐकता काँग्रेसला साथ दिली. ज्यांनी बाळासाहेबांचे ऐकले नाही ते जनतेचे काय ऐकणार, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. दरम्यान बाळासाहेबांचे शिलेदार गजानन कीर्तिकर यांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केला. तर दुसरीकडे गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव ठाकरे गटात आहेत.

Related Articles

Back to top button