- माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू तथा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात कोर्ट उद्या शिक्षेची घोषणा करणार आहे. कोर्टाने दिलेला निर्णय ऐकल्यानंतर माजी खासदार प्रज्वलला रडू कोसळले. हा निर्णय बंगळुरु येथील लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात पीडितेने कोर्टात सादर केलेली साडी महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. विशेष तपास पथकाने या गुन्ह्यात 123 पुरावे कोर्टात सादर केले होते.
- बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर प्रज्वल भावूक झाला आणि भर कोर्टात अश्रू ढाळू लागला. कोर्टातून बाहेर पडतानाही तो रडत होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर 14 महिन्यात या खटल्यात निकाल देण्यात आला आहे.
- प्रज्वलच्या विरोधातील बलात्काराच्या खटल्यात पीडितेने एक महत्त्वपूर्ण पुरावा सादर केला. पीडितेने कोर्टात एक पुरावा म्हणून एक साडी सादर केला. प्रज्वल याच्यावर घरातील सहाय्यक महिलेवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरो आहे.
- पीडितेने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तिच्याजवळ घटनेच्या दिवशीची साडी देखील होती. तिच साडी पीडितेने पुरावा म्हणून कोर्टात सादर केला. तपासात त्या साडीवर स्पर्मचे अवशेष सापडले. यामुळे बलात्काराच्या आरोपांना अधिक बळकटी मिळाली. कोर्टात सादर करण्यात आलेली ही साडीच निर्णायक पुरावा ठरली आहे.
ब्रेकिंग! माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कार खटल्यात दोषी
