- पुण्यातील उच्चभ्रू परिसरात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत खराडी परिसरातील काही पबवर रेड टाकण्यात आली. या रेडमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली.
- त्यांच्यावर रेव्ह पार्टीचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर रेव्ह पार्टी म्हणजे काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात वकील मिलिंद पवार यांनी रेव्ह पार्टीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
- कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सोबत ठेवणे, विक्री करणे, साठा ठेवणे, वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोकेनचा वापर झालेला असेल तर वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यास आरोपींना त्रास होवू शकतो. एखाद्या गोष्टीची माहिती मिळाल्यास तपास करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. घरात ज्या पार्टी होतात, त्यांना हाऊस पार्टी, गेट-टुगेदर असे म्हटले जाते. प्रत्येकाच्या घरात रोजच कार्यक्रम असतात, चार भिंतीच्या आत एखाद्या हॉटेलमध्ये येवून जेवण गेट-टुगेदर करत असतील, तर तो गुन्हा नाही. संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे.
- पुणे शहराला 2007 मध्ये रेव्ह पार्टीची ओळख झाली होती. दोनशे ते अडीचशे तरूण मुले -मुली सिंहगड पायथ्याशी सापडले. रेव्ह पार्टीला कोणी तरी आयोजक असतो. ओपन लॉन जंगल, समुद्र किनारा किंवा एखादी जागा तो बुक करतो. ठराविक लोकांचे बुकिंग घेतो, त्या पैशाच्या बदल्यात मद्य, म्युझिक सिस्टिम अन् इतर गोष्टी पुरवल्या जातात. तिथं येणाऱ्या मुलांच्या डिमांडनुसार संगीत असतं, चेव आणणारे म्युझिक असते, याला रेव्ह पार्टी असे म्हणतात.
घरात दारूची पार्टी कायदेशीर? रेव्ह पार्टी म्हणजे काय?
