राजकीय
किर्तीकर शिवसेनेतून गेले; राऊत म्हणाले, जाऊ द्या, लोक उद्या त्यांना…
खासदार गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. किर्तीकर यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किर्तीकर गेले तर जाऊ द्या. लोक उद्या त्यांना विसरून जातील, असा खोचक टोला राऊत यांनी हाणला आहे.
शिंदे गटात जाताना किर्तीकर यांनी काही आरोप केले होते. मात्र, या आरोपांना काही अर्थ नसल्याचं राऊत म्हणाले. किर्तीकर बोलतात ती अमृतवाणी किंवा शिववाणी नाही. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. त्यांच्या जाण्यानं आम्हाला कुठलाही धक्का वगैरे बसलेला नाही, असं राऊत म्हणाले.