- मुंबई लोकल ट्रेनमध्ये 11 जुलै 2006 रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान, 11 मिनिटांत 5 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 189 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर 827 जण जखमी झाले होते.
- या बॉम्बस्फोट प्रकरणी पाच जणांना फाशीची, तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र याप्रकरणात पोलीस आणि तपास यंत्रणांना योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- आपल्या सर्वांकरताच हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे. याचे कारण असे की, खालच्या न्यायालयाने त्या संदर्भात निर्णय दिला होता. 2006 साली बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस एटीएसने आरोपी पकडले होते, पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते. त्यामुळे अशाप्रकरचा निर्णय येणे निश्चितच धक्कादायक आहे. पूर्ण निर्णय मी वाचलेला नाही. परंतु मी तत्काळ आपले जे वकील आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना मी सांगितले आहे की, आपण सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले पाहिजे. आमचा प्रयत्न आहे की, लवकरात लवकरत सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाला आम्ही आव्हान करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
ब्रेकिंग! मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट! सगळेच निर्दोष मग स्फोट घडवले कोणी?
