- राज्यात काल मध्यरात्री एका व्यावसायिकावर 50 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्याच्या गाडीत त्याच्यासोबत आजारी पत्नी देखील उपस्थित होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागात भिंगार कॅम्प परिसरात घडला. विकी तनवर असे व्यवसायिकाचे नाव असून तो आपल्या आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जात असताना अचानक 50 जणांच्या जमावाने त्यांच्या गाडीला अडवले. हल्लेखोरांनी प्रथम गाडीवर दगडफेक केली व नंतर तनवर यांच्यावर धारदार शस्त्रे आणि गोळीबार करून हल्ला चढवला. या हल्ल्यात तनवर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नाही.
- प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण असून घटनेच्या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे.
राज्यात मध्यरात्री दगडफेक, गोळीबाराचा थरार
