मनोरंजन
सलमानला पाकिस्तानचा पुळका?

- पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्या १५ व्या दिवशी भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू झाला. सुमारे तीन दिवस चाललेल्या या संघर्षावर १० मे रोजी शस्त्रसंधीने पूर्णविराम लागला.
- पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीबाबत सेलिब्रिटींनी उघडपणे आपले मत व्यक्त केले. मात्र, सोशल मीडिया युजर्सना बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सची शांतता खटकली. यापैकी एक सलमान खान देखील आहे. सलमानने दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली, पण ऑपरेशन सिंदूरवर तो शांत राहिला. तीन दिवसांत त्याने एकही पोस्ट केली नाही.
- अशा स्थितीत जसा सलमानने भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर पोस्ट केले, तसाच लोकांचा राग अनावर झाला. १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता शस्त्रसंधीची घोषणा झाली आणि सलमानने रात्री सुमारे ९ वाजता एक्स हँडलवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत म्हटले, शस्त्रसंधीसाठी देवाचे आभार. ही पोस्ट जारी होताच सोशल मीडियावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.
- लोक म्हणत आहेत की, सलमानने ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ पोस्ट का केली नाही आणि आता शस्त्रसंधीवर प्रतिक्रिया का देत आहे. सोशल मीडियावर वाद वाढताच सलमानने एक्सवरून ती पोस्ट डिलीट केली आहे. यामुळे लोकांमध्ये आणखी रोष निर्माण होत आहे. सलमानशिवाय शाहरुख खान आणि आमिर खान यांच्या शांततेनेही लोकांना आश्चर्यचकित केले आहे.



