क्राईम
किरण या महिलेचा भयंकर कांड

- पुण्यामधील उच्चभ्रू भागांमध्ये स्पा सेंटरच्या आड देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई करत बाणेर आणि विमानतळ परिसरातील स्पा सेंटरवर छापे टाकले असून एकूण १८ मुलींची सुटका करण्यात आली आहे.
- यापैकी दहाहून अधिक मुली परदेशी नागरिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
- पोलिसांनी परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई केली. विमानतळ परिसरातील स्पा सेंटरवर टाकलेल्या छाप्यात १६ मुलींची सुटका करण्यात आली असून त्यापैकी दहा परदेशी आणि दोन भारतीय नागरिक आहेत.
- स्पा सेंटरच्या जागा मालक, व्यवस्थापक आणि स्पा मालक यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या कारवाईत, बाणेरमधील उच्चभ्रू परिसरात देखील पोलिसांनी एका स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे.
- या प्रकरणात किरण ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय २८, रा. खराडी) या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर पीटा कायदा, पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १५ आणि १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
- पोलिस तपासात उघड झाले आहे की, किरण ही स्पा सेंटरची मालक आणि व्यवस्थापक होती. तिने तीन तरुणींसह गरीब कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींना मसाज सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवले. नंतर त्यांना अधिक पैशांचे आमिष देत जबरदस्तीने देह व्यापारात ढकलले. आर्थिक व मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलींचा गैरफायदा घेत त्यांच्यावर दबाव टाकून वेश्या व्यवसाय चालवण्यात येत होता.



