- अक्कलकोट तालुक्यातील नाविदगी ते नागणसूर मार्गावरील रस्त्यावर झालेल्या किरकोळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा तब्बल दोन महिने पाच दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे.
- अंबिका श्रीशैल वाडेद (वय २८, रा. नागणसूर) असे विवाहित मयत महिलेचे नाव आहे. नाविदगी गावातून दोन महिने पाच दिवसापूर्वी ( दि. २६ एप्रिल २०२५ रोजी ) अंबिका वाडेद पती शिक्षक श्रीशैल वाडेद यांचे बंधू राजकुमार वाडेद ( दीर ) यांच्यासह मोटारसायकलवरुन नागणसूरला जात होते. यावेळी वाटेत समोरून बैलगाडी येत असताना बैल मारेल या भीतीने अंबिका हिने मोटारसायकलवरून उडी मारल्याने ती भर रस्त्यावर डोक्यावर आदळली. त्यामुळे अंबिका या मोटारसायकलवरुन उडून रस्त्यावर पडल्या. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना ताबडतोब सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नाविदगी येथील जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळेतील शिक्षक श्रीशैल सण्मुखप्पा वाडेद यांचे त्या धर्मपत्नी होत.
- त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, आई, वडिल, दोन बहिण, एक भाऊ, सासू, सासरे असा परिवार आहे.
अक्कलकोट! दीरासोबत बाईकवरून जात होती, समोरून बैलगाडी आली
