खेळ
ब्रेकिंग! टीम इंडियाचा मोठा धमाका, सिराज, आकाश दिपने दाणादाण उडवली

- मोहम्मद सिराज आणि आकाश दीप भारताच्या या वेगवान गोलंदाजांनी जोरदार कमॅबक करत इंग्लंडला दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 407 रन्सवर रोखण्यात यश मिळवलं आहे. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर 569 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या जोडीने सहाव्या विकेटसाठी 369 चेंडूंमध्ये 303 धावांची भागीदारी केली. या दोघांनी दीड शतकी खेळी केली.
- त्यामुळे इंग्लंडला 400 पार पोहचता आले. हॅरी आणि जेमीचा अपवाद वगळता इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी सिराज आणि आकाशसमोर गुडघे टेकले. भारताने शेवटच्या 5 विकेट्स या 20 धावांच्या मोबदल्यात घेतल्या आणि इंग्लंडला गुंडाळले. त्यामुळे भारताला 180 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. आता भारतीय संघाने दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर डोंगराएवढं आव्हान ठेवावे, अशी आशा भारतीय समर्थकांना असणार आहे.
- इंग्लंडसाठी जेमी स्मिथ याने सर्वाधिक धावांची खेळी केली. जेमीने नाबाद 184 धावा केल्या. जेमीने या खेळीत 21 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर हॅरी ब्रूक याने 234 चेंडूत 17 चौकार आणि 1 षटकारसह 158 धावा जोडल्या. जो रुट याने 22 तर झॅक क्रॉली याने 19 धावा केल्या. तर तब्बल सहा फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. बेन डकेट, ओली पोप, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर या सहा फलंदाज आले तसेच गेले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात सहा फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.



