क्राईम

अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीला कॅबिनमध्ये बोलवले, कपडे काढायला लावले अन्…

  • बीडमध्ये अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा केबिनमध्ये नेत लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. काल मध्यरात्री बारा वाजता ही कारवाई बीड तालुक्यातील मांजरसुभा परिसरात करण्यात आली आहे.
  • बीड शहरातील नामांकित शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान पवार व खाटोकर यांनी विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. तिला नग्न करत आपल्या मोबाईलमध्ये फोटोही काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी 26 जून रोजी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.
  • त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पथक रवाना झाली होती.
  • अखेर या दोन्ही शिक्षकांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड व त्यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Back to top button