- हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जीआर रद्द करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. त्रिभाषा सुत्राबाबद नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जात होता.
- सरकारच्या या निर्णयाला विरोधकांसह मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याच्या विचारात होते. आता हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. तसेच एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
- हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे दोन्ही जीआर सरकारने रद्द केले आहेत. तशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत दिली.
बिग ब्रेकिंग! हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द
