ठाकरे बंधू एकत्र! उद्धव यांच्या हाकेला राज यांचा प्रतिसाद

Admin
1 Min Read
  • राज्य सरकारने पहिली ते चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. हिंदीसक्तीचा जीआर रद्द करायला भाग पाडले. त्यासाठी महाराष्ट्रातीन जनेतचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच पाच जुलैला होणार मोर्चा रद्द केला असून त्याऐवजी विजयी मेळावा घेणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
  • जीआर रद्द झाल्यानंतर आता पाच जुलै रोजीचा मोर्चा आता विजयी मेळावा म्हणून आयोजित करण्यात येणार आहे. पाच तारखेला जल्लोष मोर्चा होणार अशी घोषणा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केली होती. त्यानंतर आता राज यांनीदेखील त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकाच मंचावर अनेक वर्षांनी दिसणार आहेत.
  • आज राज यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्यासोबत चर्चा झाली आहे. पाच जुलैचा मोर्चा रद्द झाला. आता, त्याऐवजी विजयी मेळावा घेण्याची सूचना त्यांनी मांडली. त्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे. मात्र, ठिकाण आणि वेळ जाहीर न करण्याबाबत त्यांना सांगितले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून वेळ आणि ठिकाण निश्चित करणार असल्याचे राज यांनी म्हटले.
Share This Article