क्राईम
हनिमून झाला अन् पत्नी प्रेमाने म्हणाली…

- सर्वांनाच चकित करुन सोडणारी बातमी समोर आली आहे. धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर नवरी आपल्या नवऱ्यासोबत सासरी गेली. त्यानंतर नवरीचे सासरी छान स्वागत देखील करण्यात आले. लग्नाच्या सगळ्या विधी पार पाडल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने चांगलाच कांड केल्याची बातमी समोर आली. खरंतर, लग्नाच्या पहिल्या रात्री हनीमून साजरा केल्यानंतर बायकोने अगदी प्रेमाने नवऱ्याला झोपायला सांगितले.
- हनीमून साजरा केल्यानंतर नवरा शांत झोपला आणि सकाळी त्याचा डोळा उघडताच त्याला मोठा धक्का बसला आणि तो जोरात ओरडला. नवऱ्याच्या आई-वडिलांसोबत कुटुंबातील सगळेच सदस्य नवऱ्याच्या खोलीत गेले आणि घडलेली घटना पाहिल्यानंतर ते सुद्धा अगदी चकित झाले.
- ही घटना उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील कस्बा सादाबादमध्ये घडल्याची माहिती समोर आली. लग्नानंतर हनीमूनच्या दुसऱ्या दिवशीच नवरी तिच्या सासरच्या घरातून दोन लाख रुपये घेऊन पळून गेली. आता सासरची मंडळी फरार झालेली नवरी आणि लग्न जुळवून देणाऱ्या एजन्टच्या शोधात आहेत.



