क्राईम

पप्पा मोबाईलमध्ये व्यस्त; चिमुकला ध्रुव अचानक धावत सुटला

  • राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलच्या पार्किगमध्ये येणाऱ्या एका आलिशान कार खाली येऊन एका ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना नाशिकमधील इंदिरानगरमध्ये घडली. ध्रुव राजपूत असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत मुलगा आपल्या वडिलांसोबत गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. खेळून येत असताना चिमुकला आपल्या वडिलांसोबत होता. मुलगा आणि त्यांचे वडील हॉटेलच्या पार्किंगमध्ये येताच नियतीने डाव टाकला आणि वडिलांच्या देखत मुलाचा मृत्यू झाला. गार्डनमधून खेळून आणल्यानंतर मुलाचे वडील मोबाईल पाहण्यात व्यस्त झाले. त्यानंतर वडिलांच्या पाठीमागून ध्रुव पळत आला.
  • त्यावेळी त्याने बाजुने येणारी कार पाहिली नाही. सरळ पळू लागला. कार त्याच्या जवळ येताच त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. कार चालकालाही मुलगा खाली पडल्याचे दिसले नाही. त्याने सरळ कार मुलाच्या अंगावरून पुढे नेली. कार मुलाच्या अंगावरून गेल्यानंतर कार चालकाला चोप दिला. दरम्यान हॉटेलमधील सिक्योरिटीने मुलाला रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Related Articles

Back to top button