राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरही टोल भरावा लागणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींना टोल भरावा लागणार असल्याच्या वृत्ताबाबत गडकरींनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या काही माध्यमे पसरवत आहेत. मात्र, असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट देणे सुरूच राहील. असे गडकरींनी म्हटले आहे.
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही
