- राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी मोठी बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या टोलवरही कर भरावा लागणार असून हा नियम १५ जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
- नवीन नियमानुसार, दुचाकी वाहनांना FASTag द्वारे टोल भरावा लागणार असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. जेव्हा तुम्ही दुचाकी खरेदी करता तेव्हा त्यावेळी टोल कर वसूल केला जातो. त्यामुळे जेव्हा दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल वसूल केला जात नव्हता. तर फक्त चारचाकी वाहनांसह मोठ्या वाहनांकडून टोल घेतला जात होता. परंतु, आता नव्या नियमानुसार येत्या 15 जुलैपासून NHAI वरून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांनादेखील टोल भरावा लागणार आहे.
ब्रेकिंग! दुचाकी वाहनांना लागू होणार नवा नियम
