पाच शतके, 835 धावा अन् तरीही हरली टीम इंडिया

Admin
1 Min Read

टीम इंडिया विरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड क्रिकेट टीमने बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात विजयी सुरुवात केली. इंग्लंडने लीड्समध्ये पहिल्या सामन्यातील पाचव्या आणि अंतिम दिवशी भारतावर विजय मिळवला. या सामन्यात भारताने पाच शतके, 835 धावा केल्या. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने हे आव्हान 82 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 373 धावा केल्या. इंग्लंडने यासह 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

बेन डकेट हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डकेटने शतकी खेळी केली. तर इतर फलंदाजांनी चांगली साथ देत इंग्लंडच्या विजयात योगदान दिले. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 धावा केल्या. त्यानंतर बेन डकेट आणि झॅक क्रॉली या जोडीने पाचव्या दिवशी अप्रतिम सुरुवात केली आणि इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. डकेट आणि क्रॉली जोडीने भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

भारतीय संघाच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना कर्णधार शुभमन गिल म्हणाला, हा एक शानदार सामना राहिला. आमच्याकडे संधी होती. आम्ही कॅचेस सोडल्या, खालील क्रमातील फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. मात्र, मला माझ्या संघावर गर्व आहे. एकूणच चांगला प्रयत्न केला. आम्ही 430 च्या आसपास धावा करुन डाव घोषित करु, असे आम्ही काल विचार करत होतो. मात्र, दुर्देवाने आम्ही तसे करु शकलो नाहीत. त्यामुळे कायम त्रास होतो. यावेळेस आम्ही धावा करु शकलो नाहीत. आगामी सामन्यांमध्ये आम्ही यात सुधारणा करु.

Share This Article