खेळ

ब्रेकिंग! ऋषभ पंतचा धमाका अन् मोडला धोनीचा मोठा विक्रम

  • इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज रिषभ पंत याने आज शतक ठोकले आहे. सिक्स मारत त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली. आयपीएलमध्ये समाधानकारक कामगिरी न केलेल्या पंतची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
  • लीडस टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पंतने झंझावाती शतक झळकावत टीकाकारांची तोंडे बंद केली. दहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने त्याने शतक झळकावले. हे शतक झळकावताच पंतने धोनीचा रेकॉर्डही मोडला.
  • पंतने 146 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. 44 कसोटी सामने खेळलेल्या पंत याचे हे सातवे शतक आहे. पंत हा शतकाच्या उंबरठ्यावर असताना ऑफ स्पिनर शोएब बशीर गोलंदाजी करत होता. एका हाताने त्याला सिक्स मारत रिषभने शतक झळकावले.
  • भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने भारतासाठी 90 कसोटी सामने खेळले होते. यात त्याने सहा शतके ठोकली होती. यातले एकही शतक आशिया खंडाबाहेरील देशात नव्हते. दुसरीकडे पंतने सात शतके ठोकली असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावण्याचा मान मिळवला आहे. 

Related Articles

Back to top button