महाराष्ट्र

शक्तीपीठ महामार्ग! महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा; 29.9 KM अंतर

  • गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील रस्ते वाहतुकीत मोठा बदल घडला आहे. अनेक जिल्ह्यात महामार्ग आणि रेल्वेचे जाळे मजबूत झाले आहे. मागील महिन्यात समृदी महामार्गाचे कामही पूर्ण झाले. आता गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने संपूर्ण जोर लावला आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक्सप्रेसवे पूर्ण करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. शक्तीपीठ महामार्ग पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने सरकार पाऊले टाकत आहे. पण तुम्हाला माहितेय का? या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावर देशातील सर्वात मोठा बोगदा उभारला जाणार आहे. 
  • या बोगद्यामुळे तब्बल ९० मिनिटांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे. हा बोगदा कोल्हापूर- सिंधुदुर्ग पट्ट्यात निसर्गरम्य अंबोली प्रदेशाजवळील आजरा आणि बांदा दरम्यान बांधला जाणार आहे. हा भाग शक्तीपीठ महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात मोडतो, पण याठिकाणी दोन मोठे बोगदे असणार आहेत. हा बोगदा तब्बल २९.९ किलोमीटर लांब असेल, ज्यामुळे तो देशातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरेल. नागपूर- गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाचा महत्वाचा भाग म्हणून या बोगद्याकडे बघितले जाईल. 
  • एकदा हा बोगदा पूर्ण झाला की प्रवाशांचे ३९ किलोमीटर अंतर वाचेल. ज्या प्रवासासाठी ९० मिनिटांचा वेळ लागणार होता तो प्रवास या बोगद्यामुळे अवघ्या २० मिनिटात पूर्ण होणार आहे.
  • दरम्यान नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाईल.

Related Articles

Back to top button