हवामान

ब्रेकिंग! पुण्यात अतिवृष्टी; पहाटेपासून अतिमुसळधार पाऊस

  • पुण्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. शहरातील अनेक भागांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. काही सखल भागात पाणी साचले आहे. काल देखील पुण्यात हलक्या सरींचा पाऊस होता. मात्र, आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.  
  • पुणे शहराला आणि पुणे घाट परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

  • मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोथरूड परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे.

Related Articles

Back to top button