देश - विदेश
केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन!

- भारताचा भाषिक वारसा परत मिळवण्याची वेळ आली आहे आणि राष्ट्राची ओळख त्याच्या स्वतःच्या भाषेवरून होते, असे एका कार्यक्रमात बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. तसेच मूळ भाषांमध्ये अभिमानाने जगाचे नेतृत्व करण्याची वेळ आता आली आहे, असे देखील शहा म्हणाले. शहा आज माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते.
- भारताने वसाहतवादी प्रभावाचे अवशेष सोडून द्यावेत आणि अभिमानाने स्वतःच्या भाषा स्वीकारल्या पाहिजेत, असे ते म्हटले आहे.
- या देशात, इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल अशा समाजाची निर्मिती फार दूर नाही. केवळ दृढनिश्चयी लोकच बदल घडवून आणू शकतात. माझा विश्वास आहे की आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीचे रत्न आहेत. आपल्या भाषांशिवाय आपण खरे भारतीय नाही. आपला देश, आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपला धर्म समजून घेण्यासाठी कोणतीही परदेशी भाषा पुरेशी असू शकत नाही, असे शहा यांनी सांगितले.
- अर्धवट भाजलेल्या परदेशी भाषांमधून पूर्ण भारताची कल्पना करता येत नाही. ही लढाई किती कठीण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय समाज ही लढाई जिंकेल, असे शहा म्हणाले.



