क्राईम
राज्यात ट्विस्ट! प्रेमासाठी काय पण..! तीन लाख दे, बायकोला घेऊन जा!

- सध्या अशा काही घटना समोर येत आहेत. ज्यामुळे संपूर्ण समाज हादरला आहे. पत्नीने बॉयफ्रेड सोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली असल्याच्या घटना रोज कानावर पडत आहेत. अशातच कोल्हापूरमधून एक घटना समोर येत आहे.
- या घटनेने पुन्हा एकदा सर्वांना हादरवून टाकले आहे. कोल्हापुरातील राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या तरुणाने बायको आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लखन बेनाडे गेली दोन वर्ष काम करत आहे. लखन याची २०२३ मध्ये लक्ष्मी नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली होती, पण लक्ष्मी ही त्यावेळी विशाल गस्ते नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंधात होती. काही दिवसांनी लक्ष्मी आणि विशालमध्ये भांडण होऊ लागले. या भांडणाला कंटाळून लक्ष्मीने विशालसोबत आपले संबंध संपवले आणि लखन यांच्यासोबत संपर्क वाढवला. पुढे जाऊन २०२४ मध्ये लखन आणि लक्ष्मीने विवाह केला. मात्र, लक्ष्मी पुन्हा विशाल सोबत संपर्कात आली आणि लखनची फसवणूक केली.
- लक्ष्मी, विशालच्या संपर्कात आल्यानंतर लखनकडून वेगवेगळ्या करणाने पैसे काढू लागली आणि विशालला (बॉयफ्रेंड) देऊ लागली. लक्ष्मीने लखनकडून जवळ-जवळ ८ लाखांहून अधिकची रक्कम घेऊन विशालला दिली आहे. काही दिवसांनी लक्ष्मीला समजले लखन याच्याकडील पैसे संपले आहेत. तेव्हा लक्ष्मीने पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती सर्व दागिने घेऊन पुन्हा विशालकडे गेली. याचदरम्यान, विशालचा लखनला फोन जातो. तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तर तीन लाख रुपये रोख दे. या फोननंतर लखनच्या लक्षात येत की, आपल्यासोबत फसवणूक झाली आहे.
- यानंतर लखन कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस स्टेशन गाठतो आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगतो. लखनने आपली पत्नी लक्ष्मी आणि तिच्या बॉयफ्रेंड विरोधात तक्रार केली असून, लखनच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



