खेळ
ब्रेकिंग! ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यादांच भारत- पाकिस्तान भिडणार

- भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, या एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये पाच ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यादांच क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानी संघ आमने सामने येणार आहे. या महिला विश्वचषकामध्ये पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
- महिला विश्वचषकाचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगळुरूमध्ये खेळला जाईल. तर अंतिम सामना दोन नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये किंवा कोलंबोमध्ये खेळला जाईल. जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहचला नाही तर या स्पर्धेचा अंतिम सामना बेंगळुरू येथे होणार असल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे.
- भारत आणि पाकिस्तानचा महिला संघ पाच ऑक्टोबर रोजी कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर आमने सामने येतील. विश्वचषक 30 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया एक ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.



