लग्न कर नाही तर, मारून टाकेन

अलीकडे राज्यातील विविध भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः महिला अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. तरुणांकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून एका मुलीने आपल्या जीवनाची दोर कापली.
धाराशिवच्या तुळजापुरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनीत राहत्या घरी तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले. सारिका असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
माझ्यावर प्रेम कर, लग्न कर नाही तर सोशल मीडियावर तुझी बदनामी करेल आरोपीने अशी धमकी दिल्याने 15 वर्षीय मुलीने घेतला टोकाचा निर्णय घेतला. आरोपीने मुलीला बंदुकीने मारण्याची धमकी होती.
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याने आरोपी ओंकारवर पूर्वीचाही गुन्हा दाखल आहे.



