सोलापूर

ब्रेकिंग! लग्नासाठी मुलगी दाखवतो म्हणून दीड लाख रुपये उकळून पोबारा

लग्नाकरिता मुलगी दाखवून त्या बदल्यात दीड लाखापेक्षा अधिक रक्कम उकळून पोबारा  करून फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 
तक्रारदार बाळासाहेब रमेश मोरे (वय-२७ रा.जळकेवाडी तालुका कर्जत जि.अहमदनगर) हे आपल्या आई वडील व मोठ्या भावासह राहत असून मोठा भाऊ बापूसाहेब यांच्यासाठी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक लग्न स्थळ बघत होते.
३ नोव्हेंबर रोजी फिर्यादीनी निलेश विठ्ठल यादव यांना दत्तात्रेय दळवी यांच्याकडे स्थळ बघण्याकरता सांगितले.दत्तात्रय दळवी यांनी तुम्ही वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष शामल चव्हाण (रा.गोरे वस्ती वाघोली,पुणे) यांच्याकडे जावा, असे सांगितले.
चव्हाण यांना निलेश यादव यांनी संपर्क साधला असता सोलापूर येथे मुलगी आहे. पण ती मुलगी बघण्यासाठी सोलापूरला यावे लागेल व लग्नासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
ठरल्याप्रमाणे फिर्यादी व त्यांचे कुटुंब मुलगी बघण्याकरिता सोलापुरातील टेंभुर्णी येथे आले.तिथून ते सर्वजण चार चाकी वाहनामधून सोलापूर येथे आले. सोलापुरात मुबारक मोहम्मद मुल्ला (वय-४० रा.जत) यांची ओळख करून दिली.त्यांच्यासोबत धानम्मा नागनाथ बिराजदार ही महिला होती. या दोघांनी फिर्यादीच्या नातेवाईकांना जुने घरकुल येथील पत्र्याच्या घरात घेऊन गेले.
तेथे दोघांनी सुरेखा पुजारी नावाच्या मुलीचे स्थळ  दाखवले व मुलीस मुलीचे आई-वडील मयत झाले आहेत असे सांगितले. मुबारक मुल्ला व धानम्मा बिरादार या दोघांनी आता रात्र झाली आहे. आपण उद्या लग्नाचा कार्यक्रम करू व त्यानंतर लग्नाचे पेपर तयार करून म्हणून सुरुवातीला १० हजार रुपये फोन पे वरून मागून घेतले. त्यानंतर मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी ठरल्याप्रमाणे  आरोपींनी त्यांना जिल्हा परिषद येथे येण्यास सांगितले. तेथे पुजारी उपस्थित होती. तेथे बॉण्ड लिहून घेत असताना मुबारक मुल्ला यांनी आम्हाला धानम्मा बिराजदार यांच्या बँक अकाउंट वर मोबाईल द्वारे १ लाख १० हजार रुपये पाठवण्याकरिता सांगितले.
त्याप्रमाणे फिर्यादीने मोबाईल ॲपद्वारे युनियन बँक च्या बिराजदार यांच्या अकाउंटवर ६० हजार रुपये तसेच निलेश यादव यांनी रोख ५० हजार रुपये असे १ लाख १० हजार रुपये बिराजदार यांना दिले.
शामल चव्हाण यांच्या अकाऊंटवर १५ हजार रुपये पाठवले.तर मुबारक मुल्ला यांच्या मोबाईलवर १५ हजार रुपये पाठवले.त्यानंतर धानम्मा बिराजदार हिने माझ्या अकाउंट वर पैसे आले नाहीत म्हणून तिथून पळ काढून निघून गेली.
त्यानंतर मुबारक मुल्ला व शामल चव्हाण या दोघांनी तुम्ही मुलगी सुरेखा पुजारी व तिची बहीण महानंदा या दोघींना घेऊन पुणे नाका येथे या आपण मंदिरात लग्न लावून व लग्न झाल्यावर तुम्ही मुलीला सोबत घेऊन जावा असे सांगितले.
त्याप्रमाणे आम्ही पुणे नाका येथे पोहोचलो. तेथे थांबल्यावर गाडीत उतरत असताना तेथे अचानक काही अनोळखी इसम आले व त्यांनी गोंधळ करून मुलगी सुरेखा पुजारी व महानंदा स्वामी यांना सोबत घेऊन पळून गेले. तसेच मुबारक मुल्ला यांनी आम्हाला तिथून पळून जाण्याचा सल्ला दिला. काही वेळाने सर्वांशी संपर्क साधला असता सर्वांचे मोबाईल बंद दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे मोरे कुटुंबाच्या लक्षात आले.त्यामुळे त्यांनी मुबारक महंमद मुल्ला, धानम्मा बिराजदार , शामल चव्हाण ,सुरेखा चव्हाण, सुरेखा पुजारी व महानंदा (पूर्ण नाव माहित नाही) सहा जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Back to top button