क्राईम

महाराष्ट्रातही ‘सोनम रघुवंशी’

  • इंदौरच्या राजा रघुवंशीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. लग्नाच्या काही दिवसानंतर प्रियकराच्या मदतीने पत्नी सोनमने राजाला संपवले. ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्येही अशीच एक घटना घडली आहे.
  • वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान पत्नीने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनिल तानाजी लोखंडे (वय 50) असे मृत पतीचे नाव आहे. कुपवाड शहरातील एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे.
  • पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचे अनिल यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी अनिल आणि राधिका यांच्यामध्ये काही कारणावरून भांडण झाले. याच भांडणाचा राग राधिकाच्या मनात होता. यातूनच राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली आहे.
  • अनिल यांची पहिली पत्नी मयत झाल्याने 17 मे रोजी अनिल यांचे राधिकाशी लग्न झाले होते. दरम्यान पतीच्या हत्ये प्रकरणी राधिका हिला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

Related Articles

Back to top button