क्राईम
होय, मी राजाच्या हत्येत सहभागी! अखेर सोनम रघुवंशीची कबुली

- इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांड सध्या चर्चेत आहे. हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशीनेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. पोलिसांनी याप्रकरणी सोनमसह तीन जणांना अटक केली आहे. याचबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून सोनमने एसआयटी समोर आपला गुन्हा कबुल केला आहे. याबाबतची माहिती मेघालय पोलिसांनी दिली आहे.
- समोर आलेल्या माहितीनुसार, सोनमने राजा रघुवंशीबाबतचा तिचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिस चौकशीदरम्यान सोनमने कबूल केले आहे की, तिने तिच्या मित्रांसह मिळून ही हत्या केली आहे. या प्रकरणात सोनमला साथ देणाऱ्या इतर आरोपींचीही पोलिस चौकशी करत आहेत.
- तत्पुर्वी, मेघालय पोलिस सोनमसह शिलाँगला पोहोचले आहेत. शिलाँगमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी सोनमची चौकशी सुरू केली. या हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून सोनमला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी सोनमशिवाय आणखी चार आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सोनमचा प्रियकर राज देखील आहे. या चार आरोपींसह पोलिस आता शिलाँगला पोहोचले आहेत.
- पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींची एकामागून एक चौकशी केली जात आहे. तसेच सोनमने इतरांसह राजाला ज्या शस्त्राच्या मदतीने मारले होते, ते शस्त्रही पोलिसांना सापडले आहे. पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले आहेत. यासोबतच, सोनमचा रेनकोटही जप्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस सध्या तपास करत आहेत. दरम्यान शिलाँगमधील पोलिसांनी सोनमसमोर या घटनेशी संबंधित भक्कम पुरावे सादर केले, तेव्हा तिला रडू कोसळले.



