क्राईम
हत्या, प्रेमसंबंध आणि आता प्रेग्नन्सी?

- इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवले असताना आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेघालय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आणि पतीच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची गर्भधारणा चाचणी करण्यात आल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.
- सोनमला गाजीपूर येथून सोमवारी अटक केल्यानंतर तीन महिला डॉक्टरांच्या टीमने तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी दरम्यान तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था कमकुवत असल्याचे निदर्शनास आले. सोनमच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, गर्भधारणा चाचणीचा निकाल स्पष्ट नसल्यामुळे डॉक्टरांनी सात दिवसांनंतर अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला आहे.
- सोनम जर खरंच गर्भवती असल्याचे सिद्ध झाले तर तपास मात्र अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे. हे बाळ पती राजा रघुवंशीचे आहे की प्रियकर राज कुशवाहाचे हा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहणार आहे. हेच सत्य पुढील तपासासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते. दरम्यान राजा आणि सोनम यांचे लग्न ११ मे रोजी थाटात पार पडले होते. त्यानंतर २० मे रोजी दोघे मेघालयला हनिमूनसाठी गेले होते. दोन जून रोजी राजाचा मृतदेह खोल दरीत आढळून आला. तपासात उघड झाले की, ही हत्या पूर्वनियोजित होती आणि सोनमने तिच्या प्रियकर राज कुशवाहासह हा कट रचला होता.



